अश्लिल व्हिडीओ क्लिप: क्लिप काढणारा ‘तो’ निघाला भाजपचा नगरसेवक
लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ
रवि ढुमणे, वणी: वणी षहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने शहरातील महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून लावून दिल्यानंतर तिच्याकडून पैसे घेवून वारंवार तिच्यावर अत्याचार करीत तिची चित्रफित तयार केल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलीसात दिली होती. या प्रकरणात चित्रफित तयार करणारा कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर चित्रफित तयार करण्यार्याचे नाव पुढे आले असून तो दुसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असल्याने अटक न करण्याासाठी पोलिसांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील अंगणवाडीत कार्यतर असलेल्या महिलेला पदावर लावून देण्यासाठी भास्कर गोरे या कांग्रेसचा कार्यकर्ता व कंत्राटदाराने जवळीक निर्माण करीत त्या महिलेसोबत शारीरिक संबध प्रस्थापित करीत तिच्या खाजगी भागाचे फोटो काढीत चित्रीकरण केले असल्याची तक्रार पिडीतेने पोलीसात दिली होती. या चित्रफितीचा पुरेपूर फायदा घेत भास्कर ने शहरातील विविध ठिकाणी नेवून तिच्यावर वांरवार अत्याचार केला असल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. चित्रफित पतीला दाखविण्याची धमकी देत पिडीतेकडून अंदाजे तीन लाख रूपये सुध्दा वसूूल केले. या घटनेची तक्रार पिडीतेने पोलीसात दिली तेव्हा भास्कर विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने भास्करला 18 नोव्हेबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान तो चित्रफित तयार करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. सदर घटनेचा तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संगिता हेलोंडे या करीत होत्या. प्रसंगी चित्रफित तयार करणार्या केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचे नाव पुढे आले आहे. सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असल्याने त्याला अटक न करण्यासाठी पोलीसांवर राजकीय दबाव सुध्दा येण्याची श्यक्यता बळावली आहे.
नगर पालीकेत पुर्णता सत्ता असलेल्या भाजपाचा नगरसेवक धीरज पाते याचे काळे कृत्य आता उघड झाले आहे. या प्रकरणाचा सुत्रधार भास्कर गोरे याला 18 तारखेपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र पीडित महिलेने त्याला दिलेली रक्कम अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने भास्करच्या पोलीस कोठडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा आहे. तर दुसरा साथीदार नगरसेवक धीरज पाते हा भास्कर गोरेला अटक होताच पसार झाला आहे. या तथाकथीत प्रकरणामुळे पक्षाच्या देखील अडचणी चांगल्याच वाढणार आहे. महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा कसून तपास पोलीस उपनिरीक्षक संगिता हेलोंडे करीत असल्याने या प्रकरणाला गती मिळाली आहे.
वणीत केंद्रीय मंत्री आणि आमदारांची आढावा बैठक
आज वणीतील एसबी लाॅन मध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. गेल्या वेळी सुध्दा आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या मात्र परिसरातील समस्या जैसे थे च आहे. आता या आढावा बैठकीत भारतिय जनता पक्षाच्या नगरसेवकाचा कारनामा ते वाचणार काय? किंवा त्याला अटक न होउ देण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रष्न आवर्जून उपस्थित होत आहे. केवळ भूमिपूजनाचे कार्यक्रम घेवून केवळ जनतेची दिषाभूल इतकेच येथे बघायला मिळत आहे. सत्तेत नसतांना वेकोलिच्या वार्या करणारे खासदार आता वेकोलि प्रक्रल्पग्रतांकडे दूर्लक्ष करीत असल्याचे आरोप मुंगोली परिसरातील सरपंचानी केले आहे. पुनर्वसन, मोबदला आदी प्रष्न प्रलंबित असतांना या बाबींचा आढावा लोकप्रतीनिधी घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.