नगराध्यक्षाची ठेकेदारास मारहाण, गुन्हा दाखल

0

विशेष प्रतिनिधी, वणी : शासकीय ठेकेदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिडीत ठेकेदारांनी वणी पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदचे नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार सुनील माधवराव पारखी, वय ४९ वर्ष रा. गणेश सोसायटी यांनी पो. स्टे.मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार ते  नगर परिषद वणी येथे शासकीय कंत्राटदार म्हणून  काम करतात   दिनांक ३०/५/२०१८ रोजी गांधी चौक वणी येथे  पिण्याचे पाण्याची पाईप लाईन जोडणीचे काम सुरु असताना  तेथील काही नागरिकांसोबत त्यांचे वाद झाले. त्यानंतर ते घरी निघून गेले. घरी गेल्यावर सकाळी ९.४४  मिनिटांनी न.प. अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी मोबाईल क्र.९८२२२ ००८६४ या नंबरवरून फोन करून गांधी चौक येथे  बोलाविले व  तुम्ही नागरिकांसोबत उद्दट का बोलले असे सांगून मला काही न बोलू देता कॉलर पकडून गालावर चापट मारली व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली . अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे रक्तदाब वाढल्यामुळे ते घरी निघून गेले.

बुधवारी सायंकाळी सुनील पारखी यांनी वणी पो.स्टे. गाठून  वणी न.प. चे  नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे , वय ३८ वर्ष रा. शेतकरी मंदिर रोड , वणी यांचे विरुद्द विनाकारण मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे व जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार नोंदविण्यात आल्यामुळे पोलिसांनी तक्रारदार कंत्राटदार सुनील पारखी यांची वैध्कीय तपासणी करून नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे विरुद्द NC कलम ३२३,५०४  व ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.