नागपूर येथील पथकाने वणीत पकडली लाखोंची दारू

वणी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग संशयाच्या भोवऱ्यात

0

जितेंद्र कोठारी, वणी: दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यात वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. एका व्यक्तीने दिलेल्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील पथकाने सोमवारी रात्री ७ वाजता वणी कार्यवाही करीत 16 लाख रुपयांची दारू पकडली आहे. वणीतील वाटर सप्लाय परिसरात दारूचे बॉक्स भरून चंद्रपूर जाण्याच्या तयारीत असलेले दोन महिंद्रा बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही वाहन चालकांना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाला एका व्यक्तीने सूचना दिली कि वणी येथील वाटर सप्लाय केंद्र परिसरात दोन बोलेरो वाहनामध्ये दारूच्या पेट्या भरून ते चंद्रपूर येथे जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून एक्सायज विभागच्या ६ ते ७ अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करून वणी पोलीस व येथील एक्सायज अधिकारी यांना माहिती न देता धाड मारून दारू भरलेले बोलेरो वाहन क्र. एमएच २९ –टी-००१८ आणि एमएच २९ –टी- ६३८ वाहनामध्ये भरलेले देशी दारूचे बॉक्स आणि वाहन जप्त केले. हा एकूण मुद्देमाल 16 लाखांचा आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर विभागाने केलेल्या या कार्यवाहीमुळे वणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाचे पितळ उघडे पडले आहे. वरील दोन्ही विभागाचे दारू तस्कारांसोबत मधुर संबंध असून दारू तस्करीला खुली सूट देण्यात आली आहे. याच कारणाने माहिती देणाऱ्या व्यक्तीने नागपूर येथील उत्पादन शुल्क विभागाला माहिती पुरविल्याचे चर्चिले जात आहे.

एकीकडे अवैध धंदे बंद करण्यासाठी राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना दुसरीकडे मात्र बाहेरच्या लोकांना वणीत येऊन कार्यवाही करावी लागते ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचा सूर वणीकरांमधून उमटतोय. त्यामुळे वणीतील पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग काय करतो हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील भरारी पथकाचे कोल्हे, मानकर, राहुल, गजानन नाकोडे, प्रशांत घावडे आणि वाहन चालक विनोद दुमरे यांनी पार पाडली असून या पूर्वी ही या पथकाने मारेगाव परिसरात दारू तस्करी पकडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.