धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्यासह पुलाचे काम दर्जाहीन

पुलाचे पाईप चक्क मुरुमाने झाकले़, बांधकाम अधीक्षकांकडे तक्रार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. पुलाचा पाईप चक्क मुरमाने जोडल्याने येत्या पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे.यामुळे या कामाची तत्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्या बाबतची तक्रार बांधकाम अधिक्षकांकडे प्रभागातीलच स्वप्नील नागोसे या तक्रारकर्त्याने केली आहे.

शहर विकासनिधी अंतर्गत बांधकाम विभागाकडून शहरात तीन कोटी रुपयांची विकासकामे गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. शहरातील अनेक प्रभागातील रस्ता नालीच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. कामा संदर्भात अनेक तक्रारी केल्या गेल्या मात्र यावर लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

अशातच शहरातील प्रभाग क्र.1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी लगीनघाईच्या नांदत रस्त्याचा कामाचा दर्जा हा दर्जाहीन आहे. तर रोडला जोडणाऱ्या पुलाचे काम तर फारच निकृष्ट असून कुठलाही खोदकाम न करता सिमेंट कॉंक्रीट न करता कंत्राटदारांने चक्क पुलाचा पाईप नालीत थातूरमातूर मुरमाणने जोडला आहे.

रस्ता खाली तर पाईपवर गेला आहे. त्यामुळे येत्या पहिल्याच पावसात रस्त्यासह पुलाची वाट लागून रस्ता बंद होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

कामाच्या प्रथम दर्शनी बांधकामाचा कसलाही फलक लावला गेला नाही. प्रभाग क्र 1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाच्या कामाची चौकशी करुन संबधित कत्राटदारावर कार्यवाही करावी या मागणीची तक्रार प्रभागातील स्वप्नील नागोसे या नागरिकाने बांधकाम अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे केली आहे.

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाचे कामाचा दर्जा निकृष्ट आहे. पुलाचा पाईप चक्क मुरमाने जोडल्याने येत्या पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे.यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्या बाबतची तक्रार बांधकाम अधिक्षका कडे प्रभागातीलच स्वप्नील नागोसे या तक्रारकर्त्याने केली आहे.

हेदेखील वाचा

भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

हेदेखील वाचा

आज मारेगाव तालुक्यात 29 पॉझिटिव्ह

हेदेखील वाचा

आरोग्य विभागातर्फे लिंगटी येथे कोविड 19 चे लसीकरण

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.