मारेगाव तालुक्यात आज 3 पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

21 रुग्णांनी केली कोरोनावर मात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 26 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 56 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 21 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे.

आज आरोग्य विभागाने 111 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. परंतु आज 184 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळवरून प्राप्त झाले असता त्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहे. तसेच 759 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 170 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 34 रुग्ण उपचार घेत आहे तर 125 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 6 तर 5 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.आज 21 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढत होती. आता दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून मारेगाव शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने मारेगावकरांना दिलासा मिळत आहे.

हेदेखील वाचा

भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्यासह पुलाचे काम दर्जाहीन

Leave A Reply

Your email address will not be published.