गिरीश कुबडे, वणी: मंगळवारी 12 डिसेंबर रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पंचायत समिती वणी अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महोत्सवात तीन दिवस विविध खेळ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये तंत्रस्नेही शाळेचे उदघाटन देखील करण्यात आले आहे. ग्रामपंचायत नांदेपेराच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून शाळेला बोरवेल मारून त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी शो ड्रिल सादर केले. त्यात काही शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले समाज प्रबोधनपर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंडू चांदेकर सदस्य जि. प. यवतमाळ, तर उत्घाटक म्हणून लिशा विधाते, सभापती पं. स. वणी होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संघदीप भगत सदस्य जि प यवतमाळ, चन्द्रज्योती शेंडे सदस्या पं. स. वणी, टीकाराम खाडे सदस्य पं. स. वणी ,
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. वणी,
तेजस्विनी घाटे सरपंच नांदेपेरा, एकनाथ रायसिडाम उप सरपंच नांदेपेरा, आणि सर्व ग्रामपंचयत सदस्य यांची प्रमुख्याने उपस्तिथी होती. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. आयोजक म्हणून नांदेपेरा शाळेचे मुख्याध्यापक निखाते यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.