तान्हा पोळ्यानिमित्त शाळा क्रं 8 मध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा

विद्यार्थ्यांचा मनमुराद आनंद, विजेत्यांना आकर्षक बक्षिसं...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ, वणी येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 45 विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. सर्व सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून पेपर पॅड देण्यात आले, तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटात प्रत्येकी चार-चार अशी एकूण आठ रोख बक्षिसे वितरित करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. 

या कार्यक्रमाला बहुसंख्य पालकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपद व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषाताई शिवरकर यांनी भूषविले, तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंडूजी कांबळे यांनी परीक्षकाची भूमिका निभावली. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष कार्तिक जी. रुईकर, प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे, शिक्षिका सुनीता जकाते, काकासाहेब जायभाये, अविनाश तुंबडे आणि दीपक भोयर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन कुमारी किरण जगताप यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नीलिमा राऊत यांनी मानले.

Comments are closed.