नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वणीतून हजारो समर्थक होणार रवाना
चंद्रपूर येथे आज संध्या. 4 वा. पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
बहुगुणी डेस्क, वणी: भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवारी दिनांक 8 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे संध्याकाळी 4 वाजता मोरवा येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासनाचेही याकडे लक्ष लागले आहे. या सभेसाठी वणीतूनही मोठ्या प्रमाणाक कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक चंद्रपूरला जात आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपचे हंसराज अहीर निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी अहीर यांचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे भाजपचे स्वप्न भंगले होते. या पराभव भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या दिशेने पक्षाने प्रयत्न सुरु केले. त्यानुसार एक ते दीड वर्षांपासून भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांनी लोकसभा क्षेत्रात दौरे सुरु केले होते.
महायुतीचे सरकार असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे प्रशंसा केली. यावेळी कोणतीही रिस्क नको म्हणून भाजपने मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसच्या हाती गेलेली चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत परत आणायची यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी प्रचार सभेसाठी येत आहे.
वणीतून हजारो कार्यकर्ते, समर्थक चंद्रपूरला
नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये प्रचार सभेसाठी चंद्रपूरला आले होते. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनी नरेंद्र मोदी चंद्रपूरला येत आहे. त्यांच्या या सभेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक चंद्रपूर येथे जात आहे. गावखेड्यातून गाडी करून मोठ्या प्रमाणात समर्थक जात आहे. वणीतून चंद्रपूर दौ-याला संपूर्ण तयारी देखील झाली आहे.
Comments are closed.