गुरूकुल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा संपन्न

तेल वाचवण्यासंबंधी झालेल्या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

0

देव येवले, मुकुटबन: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेन्टमध्ये 28 आणि 29 ऑगस्टला विविध राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय, भारत सरकारद्वारा तेल संरक्षणाला एक राष्ट्रीय आंदोलन बनविण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जाते. त्याअंतर्गत या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा विषय तेल वाचविण्यासाठी लहान लहान प्रयत्न सुध्दा मोठा बदल करू शकतो हा होता.

चिमुकल्यांचा स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

यावेळी चित्रकला, निबंध लिखान इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. यात इयता 5 ते 10 च्या 77 विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी मुख्याध्यापक अरविंद लाजुरकर तसेच इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकोत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.