वणीत पडळकरांविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन

आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

0

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याबद्दल राष्ट्रवादीतून जोरदार पडसाद उमटत आहेत. वणीत शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅनरवरील पडळकरांच्या प्रतिमेला काळे फासून व जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. पडळकरांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी तसेच पडळकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत याबाबत उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले.

बुधवारी दिनांक 24 जून रोजी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. शरद पवार हे देशातील एक सन्मानणीय व ज्येष्ठे नेते आहेत. ते गेल्या 55 वर्ष देशाच्या व राजकारणात ते सक्रीय आहेत. शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यावर केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या नादातून पडळकरांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. याबाबत पडळकरांवर गुन्हा दाखल कऱण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वणीत दुपारी 2 वाजता टिळक चौक येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी गोपीचंड पडळकरांच्या बॅनरवरील प्रतिमेला काळे फासत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटत असून त्याची प्रतिक्रिया वणीतही दिसून आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकर, सविता ठेपले, राज बिलोरिया, सूर्यकांत खाडे, विजया आगबत्तलवार, स्वप्निल धुर्वे, प्रतिभा वंजारे, यु एम तायडे, आशा टोंगे, प्रिया कोकर, वैशाली बहादे, मंदा दानव, फारुख शेख, एम आरिफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.