‘असं’ केलं नाही, तर ‘तसं’ होईल, पोलिसांचा इशारा
मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमेटीची बैठक
सुशील ओझा, झरी: यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी पोलिसांनी काही सूचना केल्यात. ‘असं’ करावं, ‘तसं’ करू नये याचे निर्देशही दिलेत. त्यावर अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाईला समोर जावे लागे. तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक झाली. त्यात नवरात्र उत्सवावर चर्चा झाली.
बैठकीत येणाऱ्या दुर्गा, शारदादेवी उत्सव आनंदाने व शांततेत पार पडावेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कोविड 19 चे शासनाकडून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत. अशी सूचना देण्यात आल्यात. दुर्गा व शारदा मंडळानी सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकून मूर्तीची स्थापना करू नये. आरतीच्या वेळेस पाच व्यक्तीमच्यावर कुणीही राहू नये.
मंडळात सॅनिटायझरचा, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे बंधनकारक आहे. विसर्जन व मंडपात डीजे किंवा लाऊडस्पीकर वाजविण्यावर बंदी आहे. कोणतेही गरबा, डान्स प्रोग्राम अशाप्रकारचे इतर कार्यक्रम घेण्यावरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाच व्यक्तींच्यावर जमाव करू नये. असे आढळून आल्यास पोलीस व महसूल विभागातर्फे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी सांगितले.
परिसरातील सर्व मंडळाच्या समस्या ठाणेदार यांनी जाणून घेतल्यात. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास पोलीस विभाग मदत करण्याकरिता हजर राहणार असे मिटिंग दरम्यान सांगितले. तसेच परिसरातील सर्व गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन एक गाव एक देवी असा संकल्प करून एकच मंडळ स्थापन केल्यास कुणालाही अडचण निर्माण होणार नाही. शांततेत उत्सव पार पडणार व जागेची समस्यासुद्धा सुटणार.
गुरुदेव सेवा मंडळाच्या हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. सभेत प्रमुख म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार होते. ठाणेदार धर्मा सोनुने, प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार तसेच शांतता कमिटीचे सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते. देवी विसर्जन दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपाययोजना आखण्यात आले.
बैठकीत उपस्थित प्रतिष्ठित लोकांकडून ठाणेदार यांनी गावातील देवी विसर्जन बाबत व इतर माहिती जाणून घेतली. दुर्गा उत्सव दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वधर्म समभाव समजून आनंदाने व उसत्वाने सण साजरा करावे असे आवाहन ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेकरिता नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे, रंजना सोयाम, सुलभ उईके, होमगार्ड प्रज्योत ताडुरवार, यांनी परिश्रम घेतले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)