कापूस विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी

झरी बाजार समितीचे कापूस उत्पादकांना आवाहन

0

सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सन 2020-21 या हंगामाकरिता मुकूटबन येथील मुख्य कार्यालयात दिनांक 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडून हमीभावानुसार कापूस विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कार्यालयीन सुटीचा दिवस वगळता इतर सर्व दिवस सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता दिलेल्या अटींचे पालन करावे. तसेच नोंदणीकरिता शेतकऱ्यांना 2020-21 चा 7/12 उतारा प्रत कापूस पेरा असलेला आवश्यक, आधारकार्ड झेरॉक्स, बॅंक पासबूक झेरॉक्स, आयएफएस्सी (IFSC) कोड असलेला, सुरू असलेला मोबाईल नंबर, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातीलच शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाचे प्रमाण हे त्याने धारण केलेल्या क्षेत्र व उत्पादन क्षमता यापेक्षा जास्त असल्यास सदर कापूस खरेदी करण्यात येणार नाही. नोंदणीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवानी आपला कापूस विक्रीकरिता नोंदणी करावी.

आपला शेतमाल किमान आधारभूत दराने सीसीआयला करावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, उपसभापती संदीप विचू, सचिव रमेश येल्टीवार व सर्व संचालक मंडळानी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.