राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना बांगड्याची भेट

नवाब मलीक यांना अटकेमुळे रा.का.पा. कार्यकर्ता आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडी कडून अटक करण्यात आली. अमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या या कारवाई विरोधात रा.का.पा. कार्यकर्ता आक्रमक झाले आहे. नवाब मलीक यांच्या अटकेच्या निषेध करीत वणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यानी बुधवार 23 फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेट महणून बांगड्याचा डब्बा पाठवविला.

Podar School 2025

केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाखाली व राजकीय द्वेषापोटी नवाब मलीक यांना अटक करण्यात आल्याचे आरोप शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यानी केले आहे. भारत सरकारच्या वित्त विभागाच्या अधीनस्थ संस्था अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी राजकीय द्वेषापोटी नवाब मलिक यांच्यावर अटकेची कार्यवाही केलेली आहे. ईडीची ही कार्यवाही लोकशाहीसाठी घातक आहे.  केंद्रातील सनदी अधिकारी मोदी सरकारचे बाहुले झाले असून आज पर्यंतच्या इतिहासात कधीही अशी कारवाई झाली नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरीता ईडीला हाताशी धरुन राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम मोदी सरकार करत आहे.  असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ईडीच्या अधिकाऱ्याना पोस्टामार्फत बांगड्याचा डब्बा व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सुर्यकांत खाडे, विजय नगराळे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, गुणवंत टोंगे, रामकृष्ण वैद्य, वैशाली तायडे, नागभीडकर, प्रणय बल्की, बंटी प्रेमकुंटावार, सचिन वालदे, जयस्वाल, सचीन चव्हाण, प्रणय बल्की, अनिकेत थेरे, समीर भादंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

– ईडीच्या अधिकाऱ्याना पाठविण्यात आलेली बांगड्या 

Comments are closed.