गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
'अच्छे दिन'चे वचन देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप
जब्बार चीनी, वणी: ‘अच्छे दिन आयेंगे’ असे खोटे सांगून लोकांची फसवणूक करणा-या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आगीत लोटले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन दीले .
निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासुन देशातील सर्व सामान्याकरिता गरजेच असलेल्या गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोलच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे जिवणावश्यक वस्तु समजल्या जाणा या वस्तुमुळे सर्व साधारण माणुस भरडल्या जात आहे. त्याच्या खिशाला झड़ पहुचली आहे तसेच डीझल पेट्रोलच्या भाव वाढीमुळे वाहतुक खर्च वाढला आहे. त्यामुळे किराणा, भाजीपला आदीच्या दरावरही परीणाम झाला असून वेळोवेळी होणारी दरवाढीमुळे देशातील सर्वसाधारण माणूस भरडला जात आहे.
एकतर कोरोनामुळे साधारण माणुस भरडल्या गेला आहे. त्यात ही जीवनावश्यक वस्तुची भाव वाढीने शहरी व ग्रामीणांना न झेपणारी आहे. त्यामुळे जिवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर तातडीने नियंत्रण आणावे, असे न झाल्यास भविष्यात राष्ट्रवादी मोठे आंदोलन उभारेल. निवेदनावर डॉ . महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, सुर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरीया, रामकृष्ण वैद्य, विजया आगवत्तलवार, सविता ठेपाले, मारोती मोवाडे, वैशाली तायडे, दिनेश पाउनकर यांच्या सह्या आहेत.
हे देखील वाचा: