पुनवट येथील गजानन हरिदास पिदूरकर यांचे निधन
विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील गजानन हरिदास पिदूरकर यांचे आजाराने (दि. २५) गुरुवारी रात्री निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांना सुरवातीला ताप, सर्दी असा आजार होता. त्यांच्यावर वणी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

मात्र प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने त्यांना चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात ९ ऑक्टोबरला उपचारासाठी भरती केले. त्यांना ताप, सर्दी यासह श्वसनाचा त्रास होता. उपचारादरम्यान प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर दीर्घ उपचारानंतर गुरुवारी रात्री दवाखान्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पुनवट येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी देवराव धांडे, गंगाधर पिदूरकर, कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद बोरकुटे यांनी संचालन केले. मृतकाच्या मागे पत्नी कुसुम, मुलगा अमोल, सून, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.