गजानन जोन्नलवार यांचे निधन

खातेरा (अडेगाव) येथे सोमवारी होतील अंतिम संस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: खातेरा (अडेगाव) येथील प्रतिष्ठित शेतकरी आणि व्यावसायिक गजानन जोन्नलवार (70) यांचे रविवारी रात्री 11.30 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खातेरा येथील मोक्षधामात दुपारी 12.00 वाजता अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, जावई, नातवंडं असा आप्तपरिवार आहे. मनमिळाऊ आणि आदरातिथ्य करणारा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.