वणीतील रहिवासी मंजुळाबाई लीलाधरराव पालकर यांचे निधन

आज दुपारी 12.30 वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रहिवासी असलेल्या मंजुळाबाई लीलाधरराव पालकर यांचे आज पहाटे 2 वाजता निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. दोन दिवसांआधी त्या घरी अचानक पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी दिनांक 2 एप्रिलच्या पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा पोलीस स्टेशन वणी मागील त्यांच्या घरून निघणार आहे. त्या वणीतील पालकर बुट हाऊसचे संचालक रविंद्र पालकर यांच्या आई आहेत. 3 महिन्याआधीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. मंजुळाबाई यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि नातवंड असा आप्त परिवार आहे.

Comments are closed.