घरासमोर ठेवलेल्या पिकअप वाहनावर चोरट्याचा डल्ला

शेतक-याच्या गाडीवर आता चोरट्याची नजर

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील सेलु (बु) गावात एका शेतकऱ्याची घरासमोर लावलेली महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गाडीची किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी राजू पुंजाराम मालेकर (वय 42, रा. सेलु बु, ता. वणी) हे शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र. MH 29 T 4624, पांढरा रंग) ही गाडी घेतली आहे. शेतीच्या कामासाठी ही गाडी ते भाड्याने देतात. 28 मार्च 2026 रोजी त्यांनी गावातील एका शेतक-याचा कापूस शेतातून आणला होता. त्यानंतर गावातीलच एका घराजवळ उभी केली व ते घरी निघून गेले. 

दुस-या दिवशी म्हणजे 29 मार्च 2026 रोजी सकाळी 8:20 वाजता त्यांना शेतात मजूर सोडायचे असल्याचे ते गाडी घेण्यासाठी गाडी ठेवलेल्या ठिकाणी गेले. मात्र तिथे त्यांना गाडी उभी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूचा शोध घेतला तरी गाडी सापडली नाही. अखेर गाडी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी (अज्ञात) विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तरुणीला अश्लील मागणी; फोटो व्हायरल करून बदनामी

Comments are closed.