सुप्रसिद्ध मू्र्तीकार व कला शिक्षक विश्वास विठ्ठलवार बुरडकर यांचे निधन

आज दुपारी 2 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मू्र्तीकार व सेवा निवृत्त कला शिक्षक विश्वास विठ्ठलवार बुरडकर यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. सेट डिझायनर, मूर्तीकार तसेच कला शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती. शहरात मूर्तीकलेचा प्रसार प्रचार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. विश्वास बुरडकर यांच्या निधनाने वणीच्या कलाक्षेत्रातील एका तारा निखळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विश्वास बुरडकर यांचा 21 फेब्रुवारी 1949 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी नागपूर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून एटीडी हे शिक्षण घेतले. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मंडम डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. सोबतच त्यांनी मूर्तीकला देखील सुरू ठेवली.

शहरातील अनेक प्रतिष्ठीत गणपती व दुर्गा उत्सव मंडळाच्या मूर्ती त्यांनी बनवल्या. त्यांच्यापासूनच कलेचा हा वारसा त्यांच्या भावाकडे गेले. आज बुरडकर परिवार हे कला क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत नाव आहे. विवेकानंद विद्यालयात त्यांनी कला शिक्षक म्हणून नोकरी केली. 26 जानेवारीला शहरातील शासकीय मैदानात होणा-या कला महोत्सवात त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या विवेकानंद विद्यालयाच्या देखाव्याला विविध पुरस्कार मिळाले आहे.

विश्वास बुरडकर यांच्यावर आज दुपारी 2 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना नातवंड असा आप्त परिवार आहे. विश्वास बुरडकर यांच्या निधनाने वणीच्या कलाक्षेत्रातील एका तारा निखळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

 

Comments are closed.