सोलर झटका मशिनचा बादशहा: निकेश निब्रड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त स्पेशल ऑफर, एका मशिनवर दोन गिफ्ट फ्रि
बहुगुणी डेस्क, वणी: घरची परिस्थिती साधारण, पण शिक्षणाची ओढ अफाट. अनेक मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीची दारं उघडी असतानाही, एका तरुणाने वेगळी वाट निवडली — स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची. हा तरुण म्हणजे निकेश मधुकर निब्रड. वणी शहरात ‘आर एन एन्टरप्राईजेस’ या नावाने ओळख निर्माण करणाऱ्या या युवा उद्योजकाने शेतीसाठी उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. झटका मशिनचे अतिशय अत्यल्प दरात मॅन्युफॅक्चरींग केल्याची त्यांनी सोलर झटका मशिनचा बादशहा अशी ओळख झाली आहे. झटका मशिनपासून सौर प्रणालीपर्यंत, शेतकऱ्यांच्या गरजांशी नातं जोडत गेल्या दहा वर्षांत त्यांनी 10 हजारांहून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आज त्यांच्या यशाचा एक महत्त्वाचा टप्पा — त्यांचा वाढदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरएन एन्ट्रप्राईजेसमध्ये खास वाढदिवस ऑफर ठेवण्यात आली आहे.
या ऑफरमध्ये मशिनचा दर जुनाचा राहणार असून कम्प्लिट सेटवर 2 आकर्षक गिफ्ट फ्रि दिले जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांना मशिन तर आतापर्यंतच्या सर्वात कमी दरात मशिन खरेदी करता येणार आहे. सोबतच आकर्षक उपहार देखील मोफत मिळणार असल्याने ही वणी परिसरातील सर्वात धमाकेदार ऑफर होणार आहे. ही ऑफर केवळ पुढचा एक आठवडा सुरु राहणार आहे. ग्राहकांना अधिक माहितीसाठी हनुमान मंदिराजवळ जैन ले आऊट (नवीन गोडावून) किंवा ब्लॉक नंबर 38, ओरीजीन कॉम्प्युटर जवळ वरोरा रोड वणी येथील कार्यालयात किंवा 9767816735 व 8999952507 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
आटीआय ते इंजिनिअरिंगचा प्रवास
किन्ही (ता. बल्लारपूर) या छोट्याशा गावात 9 नोव्हेंबर रोजी जन्मलेले निकेश मधुकर निब्रड यांचे बालपण संघर्षमय, पण स्वप्नांनी भरलेले राहिले आहे. वडील चालक म्हणून काम करत असताना, घरची परिस्थिती साधारण होती. नोकरीच्या निमित्ताने कुटुंब उकणी येथे स्थायिक झाले. तिथेच नवभारत हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, वरोरा येथील आयकॉन इंटरनॅशनलमध्ये बारावी पूर्ण केली. पुढे वणीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय, सावर्ला येथे इलेक्ट्रिकल पॉलिटेक्निक आणि शेवटी इंजिनिअरिंगपर्यंतचा शैक्षणिक प्रवास त्यांनी यशस्वीपणे पार पाडला.
शिक्षण पूर्ण होताच खासगी क्षेत्रात अनेक संधी चालून आल्या. शासकीय नोकरीचाही पर्याय होता. पण निकेश यांनी निवडली ती स्वतंत्र वाट — व्यवसायाची. स्वतःचा ठसा उमटवण्याच्या ध्यासाने त्यांनी 10 वर्षांपूर्वी मित्रासोबत ‘आर एन एन्टरप्राईजेस’ या फर्मची स्थापना केली. वणीतील वरोरा रोडवरील नगरपालिकेच्या गाळ्यात सुरू झालेलं हे स्टोअर आज शेतकऱ्यांसाठी उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं विश्वासाचं ठिकाण बनलं आहे. झटका मशिनपासून सौर प्रणालीपर्यंत, त्यांनी विक्रीची सुरुवात करत परिसरात एक नवा व्यवसायिक आयाम निर्माण केला.
वाजवी दर, उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार उत्पादने यामुळे निकेश निब्रड यांनी अल्पावधीतच परिसरातील शेतकऱ्यांचा ठाम विश्वास संपादन केला. जाहिरात न करता, माउथ पब्लिसिटीच्या जोरावर त्यांच्या उत्पादनांची ओळख गावागावात पोहोचली. विशेषतः शेतीसाठी उपयुक्त झटका मशिन या उत्पादनाने विक्रीचा उच्चांक गाठला. त्यासोबत तूर शेंडे कटर, हॅन्ड टॉर्च, डॉग बार्किंग मशिन यांसारख्या अनेक उपकरणांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामात सोबत दिली. प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहून, केवळ दहा वर्षांत एक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या निकेश मधुकर निब्रड यांचा आज वाढदिवस — त्यांच्या यशाचा आणि संघर्षाचा सन्मान करणारा दिवस.

वाढदिवसानिमित्त खास सुट
आरएन सोलर येथे वणीतील सर्वात कमी दरात झटका मशिन मिळते. सोबतच खरेदीवर 2 आकर्षक गिफ्ट देखील दिले जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरएन सोलर मध्ये 1 एकर ते 50 एकर पर्यंतची सोलर मशिन उपलब्ध आहेत. आरएन सोलमध्ये मध्ये पेरणी यंत्र, सोलर कॅमेरा, बार्किंग डॉग, टॉर्च, फवारणी यंत्र इत्यादी असेसरीज देखील अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. दुकान व गोडावूनची नवीन वेळ ही स. 7 ते रात्री 9 पर्यंत राहणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संचालक निकेश निब्रड यांनी केली आहे.
पत्ता – आर एन सोलर, हनुमान मंदिराजवळ जैन ले आऊट (नवीन गोडावून) किंवा ब्लॉक नंबर 38, ओरीजीन कॉम्प्युटर जवळ वरोरा रोड वणी येथील कार्यालयात किंवा 9767816735 व 8999952507 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
निकेश निब्रड यांचा प्रवास म्हणजे चिकाटी, दूरदृष्टी आणि मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण. ‘वणी बहुगुणी’ तर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Comments are closed.