कचरा, झाडा-झुडुपात हरवलेली बाग मनसैनिकांनी पुन्हा फुलवली

पालिकेच्या दुर्लक्षाला अंकुश बोढे यांचे मनसे स्टाईल नाही तर गांधीगिरीने उत्तर !

बहुगुणी डेस्क, वणी: काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याने व्यापलेली, झाडझुडपांनी झाकलेली आणि अंधारात हरवलेली प्रगतीनगर येथील बाग नागरिकांसाठी निरुपयोगी झाली होती. कधी सकाळच्या फेरफटक्यांची, महिला-वृद्धांना शतपावलीची, मुलांच्या खेळांची साक्षीदार होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी आणि मनसेने वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रारींना कानाडोळा करून नगरपालिकेने हात वर केले. अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी झाडझुडपं हटवून, कचरा साफ करून या बागेला पुन्हा जीवन दिलं. मनसे स्टाईल प्रसिद्धी आहे. मात्र मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी मनसे स्टाईल ऐवजी गांधीगिरीने उत्तर देत या उपक्रमातून शहराची जबाबदारी आपल्या हातात आहे, असा एक संदेशच दिला आहे.

वणी येथील ब्रह्माकुमारीजजवळील गार्डन हे परिसरातील नागरिकांसाठी सकाळी फिरणे, लहान मुलांचे खेळ, तसेच विश्रांतीसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाची देखभाल पूर्णपणे विस्कटली होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या या बागेतील लाईट व्यवस्था बंद पडली होती, झाडे-झुडपांनी संपूर्ण परिसर व्यापला होता आणि कचऱ्याचा ढीग साचला होता.

नगरपालिकेला वारंवार तक्रारी करूनही काहीच हालचाल न झाल्याने अखेर मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या पुढाकाराने मनसैनिकांनी साफसफाईसाठी उपकरणे, मशिन घेऊन पोहोचली. त्यांनी बागेतील झुडपे काढली, कचरा हटवला आणि परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व आकर्षक केला. या मोहिमेत शहरसचिव शंकर श. पिंपळकर, उपशहराध्यक्ष कृष्णा निमसरकर, तसेच कार्यकर्ते सूरज पळसकर, आशिष चतुर, अहमद रंगरेज, स्वयम ठाकरे, प्रवीण बोथरा, श्रेयश वरारकर, सुजल तिवारी, प्रज्योत टोंगे आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत मनसेचे आभार मानले. त्यांच्या मते, “नगरपालिकेने दुर्लक्ष केले असले तरी मनसैनिकांनी पुढाकार घेऊन बाग पुन्हा जिवंत केली. आता ही जागा पुन्हा एकदा मुलांच्या खेळासाठी, सकाळच्या फेरफटक्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणार आहे.” ही साफसफाई मोहीम केवळ एका बागेपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या सहभागातून शहरातील सार्वजनिक ठिकाणे जपण्याचा संदेश देणारी ठरली आहे.

सोलर झटका मशिनचा बादशहा: निकेश निब्रड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments are closed.