रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील दिग्रस (पाटण) येथील सरपंच, तथा माजी संचालक (कृषी उत्पन्न बाजार समिती झरी ) तालुका युवक काँग्रेसचे आधार स्तंभ निलेश येल्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त ७ जानेवारीला तालुक्यातील युवा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्या सह मित्र मंडळींनी पाटण, दिग्रस, व झरी येथे वाढदिवस साजरा करून वाढदिवस निमित्त झरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले.
काँग्रेस पक्षात मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या निलेश यल्टीवार यांचे ग्रामीण, गोरगरीब आदिवासी जनतेच्या खाजगी, शासकीय कोणत्याही कामाकरिता सदैव धावून जाणारे म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निलेश येल्टीवार ला वाढदिवसा निमित्त तालुक्यासह परिसरातून शुभेच्छाचे वर्षाव झाले. रुग्णालयात फळ वाटप करते वेळी झरी बाजार समितीचे सभापती तथा टाकळी चे सरपंच सदीप बुरेवार, पंचायत समीती उपसभापती नागोराव उरवते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ विरखेडे, पं. स. माजी सभापती मिथुन सोयाम, हरिदास गुर्जलवार, राहुल भांडेकर, रवी कामतवार, अभिमन्यू बेलखेडे, संतोष कोल्हे तथा झरी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.