एका मित्राच्या मृत्यूनंतर काही वेळातच दुस-या मित्राने सोडला प्राण

निंबाळा फाटा अपघात: दोन्ही जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: निंबाळा फाट्याजवळ झालेल्या अपघातातील दोन्ही मित्रांचा अखेर तीन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय संभाजी थेरे (वय अंदाजे 35) व नितीन खुशाल पायघन (वय अंदाजे 28) असे मृतांचे नावे आहेत. दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास वणीहून गावी पहापळला परतताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. दोन्ही जखमींवर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र त्यातील एकाचा शुक्रवारी रात्री उशिरा तर दुस-या मित्राचा त्या पाठोपाठ पहाटे मृत्यू झाला. दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे पहापळ गावावर शोककळा पसरली आहे. 

मृत विजय संभाजी थेरे (वय अंदाजे 35) व नितीन खुशाल पायघन (वय अंदाजे 28) हे दोघेही पहापळ ता. मारेगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. 7 जानेवारी रोजी रात्री ते वणीहून पहापळ येथे त्यांच्या हिरो होन्डा एसएस या दुचाकीने जात होते. दरम्यान निंबाळा फाट्याजवळ रुद्राक्ष वनाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. दरम्यान मारेगाव येथे जात असलेल्या प्रवाशाला अपघात झाल्याचे कळताच त्याने याची माहिती निंबाळा येथील ग्रामपंचायच सदस्य मनोज ढेंगळे यांना दिली. त्यांनी निंबाळा येथील गजानन विरुडकर या सहका-याला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.

यातीस एकाच्या खिशात बँकेचे पासबूक होते. त्यावरून जखमीची ओळख पटली. जखमींच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. मनोज ढेंगळे यांनी तातडीने अपघाताची माहिती वणी पोलिसांना दिली व मारेगाव येथील ऍम्बुलन्सला कॉल करून घटनास्थळी बोलावले. दोन्ही जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना आधी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने नंतर दोघांनाही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे रेफर करण्यात आले.

दोघापैकी एक जखमी कोमात गेला होता तर दुस-याची प्रकृतीही गंभीर होती. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा एका मित्राचा तर पहिल्या मित्राचा मृत्यू झाल्यानंतर दुस-या मित्रानेही अवघ्या काही तासात पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. विजय व नितीन यांच्या मृत्यूमुळे पहापळ गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज शनिवारी पहापळ येथे आणले जाणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. जनावर आडवे गेल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. तर काही जण अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्याचे सांगतात. 

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.