बांग्लादेशात हिंदूंवर होणा-या हल्ल्याविरोधात वणीत आज निषेध रॅली

दु. 12 वाजता रॅली, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: बांग्लादेशात सत्तांतरण झाल्यानंतर तेथील हिंदू आणि अल्पसंख्यांक लोकांवर हल्ले होत आहे. याचा निषेध म्हणून वणीत आज शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दु. 12 वाजता शासकीय मैदानातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान आज वणी बंद राहणार अशी चर्चा सुरु होती. मात्र बंद मुळे होणारे नुकसान गृहित धरून शहर बंदचे आवाहन मागे घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज तर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.