रेती, खनिज चोरीबाबत माजी आमदार विश्वास नांदेकर आक्रमक

जिल्हाधिकारी यांना निवेदन: कारवाई करण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील रेती घाट रेती ठेकेदारांनी पोखरून काढले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कर्ज धोरणाबाबत बँकेशी चर्चा करावी. तसेच वणीतील रुक्मिणी कोल वॉशरी मधून जो निकृष्ट प्रतीचा कोळसा महाजनकोला पाठविण्यात येत आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की वणी तालुक्यातील रेतीचे ठेकेदार मशिनद्वारे रेती उत्खनन करीत आहे. नियमांना धाब्यावर बसवून रेतीचे ठेकेदारांनी घाट पोखरून काढला आहे. रेतीचे घाटामधून झालेले उत्खनन व रेती घाटाचे मर्यादित केलेले सीमांकान व डेपोमधून विकल्या गेलेल्या रेतीचे कुठेही ताळमेळ जुळत नाही. याची चौकशी करून डेपोधारक व ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जात खरीप हंगाम पूर्ण करता येणार नाही. तरी बँकेशी चर्चा करून कर्ज धोरणात बदल करावा. केंद्र सरकार द्वारे उपलब्ध झालेल्या बी बियाणे, खते या वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ते कमी करावी. वणीतील राजूर फाट्यावर स्थित रुक्मिणी कोल वॉशरी मधून महाजनकोला पुरविण्यात येणारा कोळसा हा अत्यंत निकृष्ट प्रतीचा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निवेदन देते वेळी विश्वास नांदेकर, योगिता मोहोड, प्रसाद ठाकरे, आयुष्य ठाकरे, गणपत लेंडांगे व शिवसैनिक उबाठा उपस्थित होते.

Comments are closed.