केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा देण्यास आक्षेप नाही- आ. बोदकुरवार

यवतमाळ येथील संस्थेला जागा देण्याला विरोध कायम - आमदारांचे स्पष्टीकरण

जितेंद्र कोठारी, वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यास माझा काहीही आक्षेप नाही. मात्र यवतमाळ येथील माँ अन्नपूर्णा बहुद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेला नगरपरिषद मालकीची 20 हजार स्के. फूट जागा देण्यास माझा आक्षेप आहे. असा स्पष्टीकरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले आहे.

Podar School 2025

‘संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष व आमदार आमने सामने’ या मथळ्याखाली दि. 24 डिसेंम्बर रोजी वणी बहुगुणीमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीचे पदसाद शहरातील राजकीय वर्तुळात उमटले होते. त्यात कोट्यवधींची सरकारी जमीन कोणतीही संस्थेच्या घशात जाऊ देणार नाही. सोबतच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणी स्वतः जागा विकत घेऊन केमिस्ट भवन बांधण्यास सक्षम आहे. अशी भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्षट केले होते. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र शनिवारी 25 डिसेंबर रोजी आमदार बोदकुरवार यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला ब्लड बँक, सर्जिकल बँक व केमिस्ट भवनसाठी जागा देण्यास माझा काहीही आक्षेप नाही. असा खुलासा ‘वणी बहुगुणी’ जवळ केला. मात्र यवतमाळ येथील संस्थेला 20 हजार फूट जागा देण्यास माझा आक्षेप कायम आहे, असे ही आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या अनाथालयासाठी देण्याचा ठराव नगर पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोध केल्याने हा ठराव वादग्रस्त ठरला आहे. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत येत असताना घेण्यात आलेला सदर निर्णय वादात अडकला आहे. यावर नगराध्यक्षांनीही सेवाभावी कामासाठी असा गुन्हा वारंवार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.