प्रभाग 8 मध्ये भाजपच्या प्रचाराचा जल्लोष – ढोलताशाच्या गजरात रॅली

“प्रभाग 8 हा बालेकिल्ला”—बोदकुरवारांचा विश्वास, रॅलीत दिसली कार्यकर्त्यांची ताकद

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी प्रभाग 8 येथील उमेदवार सौ. प्रेमिला मनोज चौधरी व कुणाल संजय सोमशेट्टीवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ रॅली निघाली. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या भव्य रॅलीने परिसर दुमदुमून गेला. या रॅलीने मतदारांचे लक्ष वेधले. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर बातचित केली. रॅलीत महिलांचा व युवकांचा मोठा सहभाग दिसून आला, त्यामुळे प्रचार मोहिमेला वेग मिळाला. प्रभागातील विविध भागांतून निघालेली ही रॅली ठिकठिकाणी थांबून गृहभेटी घेत जनतेशी बोलली. यावेळी मतदारांमध्ये उत्साहाची लहर उसळली.

सकाळी प्रभाग क्रमांक 8 येथून भाजपच्या रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात निघालेली रॅली जणू उत्सवाचा माहोल निर्माण करत होती. त्यामुळे प्रत्येक गल्ली-प्रत्येक चौकात निवडणुकीचा रंग चढला होता. प्रभाग क्रमांक अ चे उमेदवार सौ. प्रेमिला मनोज चौधरी, प्रभाग क्रमांक ब चे उमेदवारा कुणाल संजय सोमशेट्टीवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम हे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सोबत रॅलीत पुढे होते.

प्रभाग 8 — भाजपचा कायम बालेकिल्ला
यावेळी बोलताना मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की, “प्रभाग क्रमांक 8 हा भाजपचा परंपरागत मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. येथील नागरिकांनी नेहमीच विकासावर शिक्कामोर्तब करत आमच्या उमेदवारांना साथ दिली आहे. या निवडणुकीतही येथील जनता प्रचंड उत्साहाने आमच्या पाठीशी उभी राहील, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या प्रभागात अनेक वर्षांपासून रखडलेली कामे भाजपने वेगात पूर्ण केली. यंदा उर्वरित सर्व कामे पूर्ण करून प्रभागाला आदर्श प्रभाग बनवणार आहोत.”

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रॅलीत स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, महिला व युवकांचा सहभाग, तसेच ढोलताशांच्या गजरात झालेला जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण निवडणुकीच्या रंगात न्हाऊन निघाले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, भाजपा शहर उपाध्यक्ष सत्यजीत ठाकुरवार, भाजपा शहर जैन प्रकोष्ठ सेलचे अध्यक्ष शुभम छाजेड, तसेच भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.