होतकरू गणेश चुरे: रंगारी पु-याचा एकमुखी आवाज
संघर्षातून घडलेल्या नेतृत्त्वाला रंगारीपुरा व परिसरातील तरुणांचा पाठिंबा
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये होतकरू अशी ओळख असलेल्या गणेश रघुनाथ चुरे यांची उमेदवारी चर्चेत आली आहे. रंगारी पु-यातील रहिवासी असलेले व सर्वसामान्य कुटुंबातून आलेले गणेश चुरे हे सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक उपक्रमात आघाडीवर राहतात. रंगारीपु-याची सर्वात मोठी समस्या असलेल्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारे नेतृत्व देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
गणेश चुरे: संघर्षातून घडलेलं नेतृत्व
गणेश रघुनाथ चुरे हे आज यशस्वी मूर्तीकार, कॅटरिंग व्यावसायिक व लघू उद्योजक म्हणून ओळखले जातात. पण या यशामागे संघर्षमय प्रवासाची कहाणी दडलेली आहे. गरीब घरात जन्मलेल्या 41 वर्षीय गणेश यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्ध्यात सोडले आणि आयुष्याच्या कठीण वाटेवर पाऊल टाकले. सुरुवातीला मूर्तीकारी आणि मजुरी करून त्यांनी गुजराण केली. या श्रमातूनच त्यांनी धैर्य, चिकाटी आणि मेहनतीची शिकवण घेतली.
मूर्तीकारी करताना त्यांनी कॅटरिंग क्षेत्रात पाऊल टाकले. आज वणीतील एक यशस्वी कॅटरर्स म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे ते परिसरातील तेरवीच्या कार्यक्रमासाठी कॅटरिंगची मोफत सेवा देतात. त्यासोबतच इतर लघू उद्योग स्थापन करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज ते केवळ व्यवसायिक म्हणून नव्हे तर संघर्षातून उभे राहिलेले एक होतकरू तरुण ओळखले जातात. व्यावसायाच्या निमित्ताने तयार झालेला जनसंपर्क ही त्यांची एक जमेची बाजू आहे.
पाणीटंचाईचा मुद्दा अग्रक्रमावर
प्रभाग क्र. 11 मधील सर्वात प्रमुख समस्या ही जुन्या पाईपलाइनमुळे होणारी पाणीटंचाई आहे. या समस्येमुळे नागरिकांना रोजच्या जीवनात मोठा त्रास सहन करावा लागतो. एका गल्लीत पाणी तर दुस-या गल्लीत अपुरे पाणी, अशी या प्रभागातील परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हा मुद्दा त्यांच्या अग्रक्रमावर राहणार आहे. “पाणी हे जीवन आहे, आणि मी या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, पुरेसा पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी झटणार,” असे मत गणेश चुरे व्यक्त करतात.
रंगारीपु-याचा एकमुखी आवाज गणेश चुरे
रंगारी पु-यातील अधिकाधिक नागरिकांनी गणेश चुरे यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी वार्डातील नागरिकांनी सध्या परिसरात मिटिंगचे सत्र सुरु केले आहे. रंगारी पुरा तसेच शेजारील वार्डातील तरुणांनी गणेश सारख्या एका होतकरू तरुणाच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. सध्या गणेश हे कुठल्याही पक्षात नसून त्यांनी एका पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. जर पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यास पक्षातर्फे ते उभे राहणार, अन्यथा रंगारीपुरा व परिसरातील नागरिकांच्या बळावर अपक्ष राहणार असा निश्चय त्यांनी केला आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये महाराष्ट्र बँक चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, 8 नंबर शाळा, सेवा नगरचा काही भाग ते निर्गुडा नदी पर्यंत, रंगारी पुरा, गौरकार चौक, शिवनेरी चौक, गणेश पूर रोड इत्यादी परिसरांचा समावेश होतो. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर उपाययोजना करणे हा त्यांचा प्रमुख निवडणूक मुद्दा राहणार आहे. गणेश चुरे यांची उमेदवारी ही प्रभागातील नागरिकांसाठी एक पर्याय नसून, ती पाणी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल ठरू शकते. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
(आपणही नगर पालिकेसाठी इच्छुक असाल तर 9096133400 (संपादक वणी बहुगुणी) या क्रमांकावर संपर्क साधा.)
Comments are closed.