तडीपार असून फिरत होता मोकाट, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एकाला दीपक चौपाटी तर दुसरा सर्वोदय चौकातून ताब्यात

बहुगुणी डेस्क, वणी : तडीपार असूनही वणी शहरात गुन्हा करण्याच्या हेतूने फिरत असलेला एका युवकासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांची नावे गोपी किशन लोणारे (३०) आणि साहिल कैलास पुरी (२२) अशी असून, दोघेही सेवानगर, वणी येथील रहिवासी आहेत.

मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दीपक चौपाटी परिसरात एक इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव गोपी किशन लोणारे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध कलम 112 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.

यानंतर बुधवारी दुपारी दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी साहिल कैलास पुरी याला नेताजी सुभाषचंद्र चौकाजवळील देशी दारूच्या भट्टी परिसरात फिरत असताना ताब्यात घेतले. चौकशीत तो यवतमाळ जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार असल्याचे उघड झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत एलसीबीचे पीआय सतीश चतरे, एपीआय दत्ता पेंडकर, हवालदार सुधीर पांडे, नीलेश इनमकर, सलमान खान, रजनीकांत मडावी आणि सतीश फक यांनी सहभाग घेतला.

Comments are closed.