विद्यार्थ्यांच्या मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र दिनानिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेत साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता केजी टू पीजी निवृत्त शिक्षक संघटना वणी यांच्या तर्फे व्यायाम शाळेच्या आवारात अंबादास कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य महादेव घागी, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, बी,एन ढोके. गणपत पारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पां अं ताटेवार यांनी केले.

संध्याकाळी 4 वाजता 50 ते 60 विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात प्रामुख्याने लाठीकाठी, दांडपट्टा, चक्र, बणलाठी इत्यादी आत्मरक्षणाचे प्रकार दाखविण्यात आले. तेजस्विनी राजू गव्हाने हिच्या नेतृत्त्वात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी मान्यवरांतर्फे तर्फे तेजस्विनी गव्हाणे, तिचे वडील राजू गव्हाणे व आजोबा देवरावजी गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद इंगोले यांनी मुलांमुलींना मैदानी खेळाचे मोफत प्रशिक्षण द्यायची घोषणा केली तर डॉ. महेंद्र लोढा यांनी लोढा हॉस्पीटल तर्फे मोफत वैद्यकीय सेवा देण्याची घोषणा केली.

कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार विजेते रानानुर सिद्दीकी, किरण देरकर, संध्या रामगिरवार, सुमित्रा गोडे, वैशाली तायडे, डॉ.महे़द्र लोढा‌, ऍड. नीलेश चौधरी, ओम ठाकुर, शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुर, अवि भुजबळराव, क्रांती युवा संघटनेचे राकेश खुराणा. यवतमाळ येथील पीआय पवार, शेखर वांढरे, अजय ढोणे, प्रा.रोहीत वनकर, पुरुषोत्तम आक्केवार, दादा राऊत, बंडु निंदेकर, दिलीप येमुलवार यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

ITI येथे 8 मे रोजी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

Comments are closed.