नृसिंह व्यायामशाळेची मिरवणूक, थरारक प्रात्यक्षिक ठरले आकर्षण
चिमुकल्यांनी सादर केली लाठीकाठी व चक्र
विवेक तोटेवार, वणी: गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी वणीतील सुप्रसिद्ध नृसिंह व्यायाम शाळेद्वारे मिरवणूक काढण्यात आली. यात चिमुकल्यांनी सादर केलेली लाठीकाठी या चक्र या खेळानं वणीकरांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं.
दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंह व्यायामशाळेद्वारे मिरवणूक काढली जाते. यात व्यायामशाळेचे सदस्य विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवतात. त्यामुळे ही मिरवणूक वणीमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. यावर्षी चिमुकल्या मुलामुलींनी सादर केलेली लाठीकाठी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनली. सोबतच काही ज्येष्ठ मल्लांनीही यावेळी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले.
पावसाने काहीसा व्यत्यय आणल्याने मिरवणूक संध्याकाळी 7 वाजता निघाली. नृसिंह व्यायामशाळेपासून ते दिपक टॉकीज चौपाटी ते भगतसिंग चौक असा प्रवास करत या मिरवणुकीचा समारोप नृसिंह व्यायम शाळेत झाला. प्रत्येक चौकात लाठीकाठी आणि चक्र याचे सादरीकरण करण्यात आले. मिरवणुकीत शेकडो सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता पुरूशोत्तम आक्केवार, बाबा कुल्दीवार, रामदास ठेंगणे, महादेव पुल्लेवार, देवरावजी गव्हाणे, राजुभाउु गव्हाणे, बाबुलालजी पोटदुखे, रमेश उगले, बंडु खिरेकार, ताटेवार सर, विनोद षर्मा, सागर डांगरे, बबलु उगले, आषिश चौधरी, संतोश जोषी, सुरेष मोरे, विनोद बोरिकर आदींने परिश्रम घेतले.
लिंकवर क्लिक करून पाहा चिमुकलीने सादर केलेले थरारक प्रात्यक्षिक…