ओबीसींना प्रशिक्षित करून हक्काच्या लढाईसाठी तयार करणार
मारेगाव येथे झाली ओबीसी परिषदेची बैठक
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव, वणी, झरी तालुक्यात नव्यानच स्थापन झालेल्या ओबीसी परिषदच्या वतीने मारेगाव येथे ओबीसी परिषदेची बैठक झाली. मृत्युंजय मोरे यांचे निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. आरक्षण असूनही ओबीसी घटक हा मागास आहे. त्यामुळे ओबीसींना सर्वप्रथम त्यांच्या हक्काची माहिती देऊन, त्यांना प्रशिक्षित करून हक्काच्या लढाईसाठी तयार करण्यात येईल असा निर्णय या बैठकीत झाला. याशिवाय ओबीसीमध्ये असलेल्या अनेक समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
ओबीसी मध्ये अनेक जाती धर्मातील लोक येतात. संविधानानं ओबीसींसाठी अनेक सवलती दिल्या आहेत. मात्र याबाबत ओबीसी समाजात जागृती नाही. त्यामुळे ओबीसी जागृत व्हावा, त्याला आपले हक्क अधिकार माहित व्हावे, तसेच ओबीसींसाठी मंडल आयोग कसा फायदेशिर होता या संदर्भात ओबीसींना प्रशिक्षित करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
या बैठकीत अजय धोबे आणि प्रवीण खानझोडे यांनी ओबीसी परिषदेची सविस्तर भुमिका मांडली, अनामिक बोढे यांनी ओबीसीमध्ये असलेल्या उणीवांवर विवेचन केले. या बैठकीला अनंत मांडवकर, विजय खामणकर, आकाश बदकी, रामभाऊ जिड्डिवार, अॅड.अमोल डोंगर, अॅड.मेहमुद पठाण, वणीचे सातवकर, विकेश पानघाटे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, विवेक बोबडे, नंदकिशोर चिंचुलकर, किशोर बोढे, खडसे, श्रावण किन्हेकर इत्यादी ओबीसी बांधव उपस्थित होते. बैठकीचा समारोप अॅड.मेहमुद पठाण यांनी केला.