ओबीसीतील सर्व जातींना क्रिमीलेयर मधून वगळा: संभाजी ब्रिगेड
झरी तालुक्यातील ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं निवेदन
देव येवले, मुकुटबन: मागासवर्ग आयोगाने 28 ऑक्टोबर 2014 आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यात विमूक्त जातीतील 14, भटक्या जातीतील 23, विशेष मागास प्रवर्गातील 1 आणि ओबीसी संर्वगातून एकूण 116 जातीना क्रिमीलेयरची अट लावण्याची शिफारस केली आहे. हा प्रकार ओबीसीमधे फूट पाडणारा आहे. कुणबी समाजा सह ओबीसी मधील सर्व जातींना क्रिमीलेयर मधून वगळावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड झरी तालुका व मराठा सेवा संघ झरी तालुका यांच्या कडून 26 ऑक्टोबरला नायब तहसीलदार झरी यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
हे निवेदन देताना मराठा सेवा संघाचे व संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी शिवाजी बेलेकर, प्रशांत बोबडे, इरफान शेख, विशाल ठाकरे, विनोद पिंपळकर, विजय भेदूरकर, नितेश ठाकरे, देव येवले, छत्रपती काटकर, शंकर झाडे, अशोक पानघाटे, केतन ठाकरे, दीपक हीरादेवे, संदीप ऊइके, संदीप आसुट्कर, मंगेश झाडे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते .