मारेगावात कृषी केन्द्रावर तालुका कृषी अधिकारी पथकाची कारवाई
फवारणीतुन विषबाधा प्रकरण परवानगी नसलेले किटकनाशकांची सर्रास विक्री
ज्योतिबा पोटे, मारेगाव: फवारणीतुन झालेल्या विषबाधेतून तालुक्यातील ३ शेतकरी व एक शेतमजुर मृत्युमुखी पडला आहे. तसंच ६६ शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याच स्पष्ट झालंय, या पार्श्वभूमीवर मारेगाव येथे दि ५ आॅक्टोबरला तालुका कृषी आधिकारी पथकाने शहरातील सात कृषी केन्द्रावर कारवाई करुन स्टाॅक रजिस्टर ताब्यात घेतले. त्यामुळे कृषी केन्द्रचालकाचे धाबे दणाणले आहे.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपला कृषिमाल वाचविण्यासाठी मालावर वर्षानुवर्ष किटकनाशकाची फवारणी करित आला, परंतु या चालु हंगामात तालुक्यातील शेतकर्याना फवारणी दरम्यान कीटकनाशकाची विषबाधा झाली. या मागे कीटकनाशक कंपन्याचे कृषिकेन्द्रावर विक्रीसाठी परवानगी नसलेले कीटकनाशक असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनात आले. कृषी केन्द्र तपासणी दरम्यान तालुक्यातील अनेक कृषिकेन्द्र अचानक पणे बंद झाल्याची माहिती मिळत आहे. या फवारणी बाधित शेतकर्याच्या मृत्यु मागे बिगर परवानगीचे कीटकनाशके कारणीभूत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
या तपासणी साठी एस.डी.ओ.च्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कारवाईचे सूत्र तालुका कृषी अधिकारीच सांभाळत असुन, झालेल्या कृषिकेन्द्र तपासणी टिम मधे मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषिअधिकारी राकेश दासरवार, कृषि सहाय्यक अधिकारी कचाटे, मारेगावचे उपनिरिक्षक राहुल कुमार राऊत,हे तपासणी पथकात सामील होते.
कृषिकेन्द्रावर झालेल्या कारवाईत कृषी केन्द्रचालकाचे स्टाॅक रजिस्टर अाणी दुकाणाची पाहणी केली. या कारवाईने परवानगी बाह्य कीटक नाशकाची विक्री बंद होईल,की प्रशासकीय यंत्रणा काय ठोस निर्णय घेते या कडे शेतकर्याचे लक्ष लागले असुन, मृत्यूमुखी व बाधित शेतकर्याना शासनानी तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.