प्रभाग 10 मधून युवा नितीन रामगिरवारांची दमदार एन्ट्री !

स्वच्छता आणि पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार !

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 10 मधून सामाजिक कार्यात सक्रिय आणि जनसंपर्कात अग्रणी असलेले युवा कार्यकर्ते नितीन रामगिरवार हे मजबूत इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. साध्या कुटुंबातून येऊन आपल्या परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि कार्यतत्परतेमुळे त्यांनी जनतेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिसरातील पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत, या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ‘ओळख इच्छुक उमेदवारांची’ या वणी बहुगुणीच्या सदरात आज आपण भोईपुरा येथील रहिवासी असलेले नितीन रामगिरवार यांच्याबद्दल जाणून घेऊया…

नितीन रामगिरवार यांचा थोडक्यात परिचय 
नितीन हे एका सर्वसाधारण कुटुंबातून येतात. ते भोईपुरा येथील रहिवासी आहेत. त्यांचा गांधी चौक येथे टेलरिंग व्यवसाय आहे. त्यांचा नातं केवळ सुई व धाग्यापुरते मर्यादीत नसून त्यांनी सर्वसामान्यांशी जनसंपर्काची मजबूत विण बांधली आहे. व्यवसाय सांभाळून ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहतात. परिसरातील समस्या सोडवण्यासाठी त्यांची कायम धडपड असेत. शिंपी समाज संघटनेच्या युवा कार्यकारिणीचे गेल्या 10 वर्षांपासून अध्यक्ष आहे. तर वणीतील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या ते संचालक पदी आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच अडी अडचणीत असलेल्या लोकांच्या ते कायम मदतीला धावून जातात. 

स्वच्छता व पाणी प्रश्न अग्रक्रमावर 
प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात मोठी समस्या ही पाणी व स्वच्छतेची आहे. चार दिवस नळाला पाणी येत नाही. याच प्रभागात मच्छी मार्केट येते. मात्र आधीच्या लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने येथील स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष केले. स्वच्छता व पाणी प्रश्न हा अग्रक्रमावर राहील. सध्या त्यांनी एका पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. जर पक्षाने तिकीट दिली तर पक्षातर्फे अन्यथा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशी माहिती नितीन रामगिरवार यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 10 जुनी जुनी महाराष्ट्र् बँक (श्रीकृष्ण भवन) ते सटवाई माता मंदिर, जटाशंकर चौक, अमृत भवन, गांधी चौक, मोमीन पु-याच्या काही भाग तसेच रामपुरा, भोईपुरा, सुभाष चंद्र चौक सर्वोदय चौक इत्यादी परिसर येतो. वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 10 हा ‘हॉटसीट’ ठरला आहे. इथे रामगिरवारांची एन्ट्री केवळ उमेदवार म्हणून नाही, तर समस्या सोडवणारा ‘सोल्युशन प्रोव्हायडर’ म्हणून आहे. सामाजिक कार्यात सक्रिय, व्यवसायाने ‘मास्टर’ असलेले नितीन जनसंपर्कात देखील मास्टर आहे. “नितीनसारखा तरुणच आमच्या समस्या समजेल,” अशा भावना भोईपुरा, रामपुरा व प्रभागातील मतदार व्यक्त करीत आहे.

Comments are closed.