मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

महिलेला कमी ऐकू येत असल्याने घडली दुर्घटना

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथुन कोळसा घेऊन आदीलाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून वृद्ध महिला ठार झाली. सदर घटना सोमवार 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता दरम्यान लिंगटी रेल्वे स्थानका समोर घडली. महिलेला कमी ऐकू येत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार धानोरा (नवीन) गावातील रामक्काबाई देवगा पार्लेवार (80) ही वृद्ध महिला रेल्वे रूळ ओलांडून शौचास जात होती. दरम्यान वणी येथुन कोल्हापूर कडे कोळसा भरून जात असलेली मालगाडी त्याच रुळावर आली. वृद्ध महिला रेल्वे रुळाकडे येत असल्याचे दिसतंच लोकोपायलटनी जोराने हॉर्न वाजवत मालगाडीचे वेग कमी केले. मात्र वृद्ध महिलेला मालगाडीचे हॉर्न ऐकू आले नाही आणि इंजिनची धडक लागून ती रेल्वे रुळाच्या बाजूला फेकल्या गेली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात डोक्याला मार लागून जागीच ठार झाली. मृत वृद्द महिलेला कमी ऐकाला येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिला ठार झाल्याची माहिती मिळताच गांवातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत रेल्वे प्रशासन व पाटण पोलिसांना माहिती देऊन पाचारण्यात आले.

दुर्घटनेबाबत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी कुठलीही तक्रार केली नसल्याची माहिती आहे. तसेच मृतकाचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान गावातच करण्यात आले.

हे देखील वाचा:

Comments are closed.