वणीतील रामपुरा वार्ड येथून ज्येष्ठ महिला बेपत्ता

माहिती मिळाल्यास आशिष मोहिते (मुलगा) – 9284451408 या क्रमांकावर संपर्क साधा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील रामपुरा वॉर्ड, श्री काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या मुलीकडे आलेल्या रत्नमाला रामदास मोहिते (वय 69) या महिला 12 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. मुलगी सकाळी फिरण्यासाठी गेली असताना त्या घरी एकट्याच होत्या. परत आल्यानंतर घरात त्या दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली; मात्र अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

रत्नमाला मोहिते यांची उंची सुमारे 5 फूट 3 इंच असून रंग गोरा आहे. त्यांच्या उजव्या हातावर “शांता” असे गोंदविलेले आहे. घरातून निघताना त्यांनी काळ्या रंगाची साडी नेसली होती, सोबत पिवळ्या रंगाची बॅग होती तसेच पायात तपकिरी रंगाची चप्पल होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.संबंधित महिलेबाबत कुठेही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

📞 संपर्क :
आशिष मोहिते (मुलगा) – 9284451408
गौरी बोरकुटे (मुलगी) – 7387122529

Comments are closed.