पुरुषोत्तम नवघरे, वणी: रविवारी दिनांक 18 जून रोजी तालुक्यातील पळसोनी येथे एकदिवशीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पंचशील बुद्ध विहारात हा कार्यक्रम घेण्यात आला. नवयुवक बुद्ध विहार समितीच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात मार्शल अशोक खरतडे यांमनी बौद्धांची आदर्श विवाह पद्धती या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मार्शल प्रकाश दातार यांनी बावीस प्रतिज्ञा या विषयावर मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात मार्शल विलास नरांजे यांनी आंबेडकरी चळवळ या विषयावर मनोगत व्यक्त केले तर सत्राची सांगता मार्शल शीतल चिकाटे यांच्या आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग या मनोगताने झाली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे संचालन मार्शल ईश्वर चिकाटे यांनी केले तर दुस-या सत्राचे आनंद नगराळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जगदिश पाटील, विलास तेलंग, नवनाथ नगराळे, राजू खैरे यांच्यासह नवयुवक बुद्ध विहार समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.