अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी वणीतील सतिघाट रोडवर एक इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास महादेव भानुदास डंभारे (57) राहणार दरा साखर हे 11 वाजता आपल्या दुचाकीने कायरला जाण्यास निघाले. कायरवरून काम करून परत येत असताना वणी ते सतिघाट रोडवर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

Podar School 2025

या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ते वाटेतच पडून असताना जवळपास 1.30 वाजत सुरज गुलाब आत्राम यांनी महादेवला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डोक्याला मार अधिक असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या भावाच्या तक्रारीवरी वणी पोलिसात अज्ञात वाहनाच्या विरोधात कलम 279, 304 (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो ऊ नी विजय गराड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.