बेलदार समाजाची युवक कार्यकारणी गठीत

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 1 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजता काळाराम मंदिर येथे झालेल्या बैठकीत वणीतील बेलदार समाजाची युवक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या बैठकीत समाज भवनासाठी जागा यावर चर्चा करण्यात आली तसेच यात समाजाच्या उन्नतीसाठी युवक वर्गाने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

वणी शहर युवक कार्यकारीणी मध्ये अध्यक्ष म्हणून विनोद महाजनवार यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष राजू मारगमवार, सचिव सगर बरशेट्टीवार, सहसचिव अमोल गंधेवार, प्रसिद्धीप्रमूख विवेक तोटेवार, कोषाध्यक्ष निखिल बेझलवार प्रकाशक लोकेश गुंडलवार सदस्य गजानन अंबरवार अशाप्रकारे पद बहाल करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोनगीरवार उपाध्यक्ष बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम उर्फ बाबाभाऊ कुल्दीवार, संस्था सल्लागार तथा अध्यक्ष, नृसिंह आखाडा वणी, पांडुरंग ताटेवार, सचिव, बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी श्रीनिवासजी येडलावार, संस्था सल्लागार बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी सुधाकर बोनगीरवार, कोषाध्यक्ष, बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी राकेश भाऊ बूग्गेवार, नगरसेवक,न.प. वणी, अशोक ठाकूरवार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन राकेश बरशेट्टीवार यांनी केले. तर प्रास्ताविक उमाकांत जामलीवार यांनी केले. यावेळी गजानन चंदावार यांनी मनोगत व्यक्त केले तर शेवटी आभार सन्माननीय विशाल बोरकूटवार यांनी मानले.
सर्व वणीकर बेलदार समाज बांधव यांच्या उपस्थितीत बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था,वणी अंतर्गत खालील प्रमाणे वणी शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली.
कार्यकारामच्या यशस्वीतेसाठी अविनाश पोचमपेल्लीवार, धीरज एडलावार, नंदकिशोर जूब्बेवार, आतिष बूरेवार, राकेश बोंपल्लीवार व बेलदार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.