बहुचर्चीत संतोष वाटेकर हत्या प्रकरणात एक संशयीत ताब्यात

एटीएमची रक्कम घेऊन फरार झालेल्या संतोषचा सापडला होता मृतदेह

0

जब्बार चीनी, वणी: बहुचर्चीत संतोष वाटेकर हत्या प्रकरणी एका संशयीताला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव लखन उर्फ रविकांत नक्षीने असून त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्याला कोरपना न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणा-या संतोष वाटेकर मृतदेह याचा 29 फेब्रुवारीला कोरपना परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणात एका व्यवसायिकाला संशयीत म्हणून ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष वाटेकर हा वणीतील विठ्ठलवाडीतील परिसरात राहायचा. तो ईपीएस लॉजी कॅश सोल्युशन प्रा. लिमिटेड या कंपनीत काम करायचा. त्याच्याकडे परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्क्म भरण्याचे काम होते. 20 फेब्रुवारी रोजी त्याने स्टेट बँकेतून 83 लाख रुपयांची उचल केली होती. त्यातील 55 लाख रुपये त्याने अन्य सहका-यांना देऊन तो 28 लाख रुपये घेऊन तो कॅश भरण्यासाठी गेला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. तसेच त्याने ती रक्कमही भरली नसल्याचे समोर आले होते.

प्रातिनिधिक फोटो

या प्रकरणी तेव्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र अखेर घटनेच्या आठ दिवसांनंतर 29 फेब्रुवारीला त्याचा मृतदेह कोरपना तालुक्यातील गाडेगाव-विरूर मार्गावरील जंगलात आढळून आला. मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. त्याबाबत विविध तर्कवितर्कही लावले गेले. मात्र लॉकडाऊनच्या काळात या प्रकरणाचा तपास मागे पडतोय की काय अशी परिस्थिती असताना तीन महिन्यानंतर या प्रकरणी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वणीतून लखन उर्फ रविकांत नक्षीने या संशयीताला ताब्यात घेतले. लखन हा एक बारचालक आहे. एका बारचालकाचे नाव या प्रकरणात संशयीत म्हणून आल्याने परिसरात एकच  खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी विविध चर्चेला ऊत आला होता. त्याचे शेवटचे लोकेशन एका बारमध्ये सापडले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. मृतकाने अऩेकांना व्याजाने पैसे दिल्याचे बोलले जात होते त्यामुळे या प्रकरणाचा या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू होता. अखेर या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर एका संशयीताला ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचे गूढ उकलणार का याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.