वणी बहुगुणी डेस्क: कोरोना माहामारीमुळे देशभरात लॉगडाऊन सुरू आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने त्याची झळ विद्यार्थ्यांनाही बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता वणी पब्लिक स्कूल जूनियर कॉलेज तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. शुक्रवारी दिनांक 24 एप्रिलपासून वर्ग 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या क्लासला सुरुवात झाली आहे व लकरकच 10 वीच्या विद्यार्थ्याचा ऑनलाईन क्लास सुरू करण्यात येणार अशी माहिती महाविद्यालय व्यवस्थापनाने दिली आहे.
एका ऑनलाईन एज्युकेशन टूल्सद्वारा या सर्वांना ऑनलाईन ध़डे दिले जात आहे. ज्या विषयाचे जितके विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरून या ऑनलाईन क्लासला हजेरी लावत आहेत. ऑनलाईन क्लास सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न किंवा शंका असेल त्या त्यांना स्क्रिनवरून समोरासमोर विचारताही येत आहेत. इंग्रजी या विषयाला सर्वाधिक 80 विद्यार्थ्यांची हजेरी असते.
इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही घेता येणार लाभ – चिन्मय चचडा
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काही वेगवेगळे टुल्स तयार करून त्याद्वारा एक प्रयोग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येतोय. या क्लासची कॅपिसिटी 300 ची आहे. सध्या हा क्लास कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सुरू असला तरी आम्ही आणखी 1 तारखेपर्यंत या प्रयोगाची टेस्ट घेत आहोत. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर 1 मे नंतर इतर कॉलेजच्या इच्छुक विद्यार्थ्यांनाही या क्लासला हजेरी लावता येणार आहे. इतर शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत प्रसार माध्यमातून माहिती देण्यात येणार – चिन्मय चचडा, कॉम्पुयटर सायंस फॅकल्टी