ऑनलाईन फसवणूक झाल्यास 1930 वर कॉल करा

ठाणेदारांचे आवाहन, पोलीस ठाण्यात पार पडली बैठक

विवेक तोटेवार, वणी: सायबर क्राईम, सराफ दुकानदारांची फसवणूक, दुकानातून होणारी लूट, बँक ग्राहकांची फसवणूक, फेक कॉल, ऑनलाइन फसवणूक हा प्रकार गेल्या तीन चार वर्षांपासून मोठया प्रमाणात सुरू आहे. याबाबत मंगळवारी दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता वणी पोलीस ठाण्यात व्यापारी, सराफा व बँक कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. ग्राहकांनी बँक व्यवहारात फसवणूक झाल्यास तातडीने 1930 वर कॉल करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी व पोलीस अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  

लूट होऊ नये म्हणून अनेक दुकानदार व बँक सीसीटीव्ही कॅमेरे लावते. परंतु ज्या ठिकाणी वाहन पार्किंग केल्या जाते त्या ठिकाणी कॅमेरा नसल्याने त्या वाहनाची ओळख होत नाही. शिवाय अनेकदा ग्राहक हा बँकेत किंवा दुकानात येतांना तोंडाला बांधून किंवा हेल्मेट घालून येत असल्याने त्याची ओळख पटत नाही. व्यक्तीचा चेहरा व गाडी क्रमांक स्पष्ट दिसणार असे हाय डेफिनेशन कॅमेरा लावणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन यावेळी अनिल बेहराणी यांनी केले. 

बँकेत गार्ड असावा, बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक झाल्यास सरळ पोलिसात न पाठविता त्याची तपासणी करून प्रूफ जोडून नंतर पोलिसात ग्राहकाला पाठवावे. कुहीही व्यक्ती जर वारंवार बँकेत किंवा दुकानात या जा करीत असल्यास त्याची चौकशी करून नाव मोबाईल क्रमांक व त्याचे काम कोणते आहे याबाबत सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच संशय असल्यास पोलिसांना याबाबात सूचना देण्यात याव्या.   

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिवसेंदिवस फेक कॉल व ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. असे बँकेच्या ग्राहकासोबत झाल्यास त्याला पोलिसात न पाठविता 1930 या क्रमांकावर फोन करून ट्रान्झिकशन आयडी, अमाउंट व तारीख याबाबत माहिती दिल्यास त्या ग्राहनकाचे पैसे परत मिळू शकतात. पोलीसात तक्रार देण्यात वेळ गेल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या नंबरवर माहिती द्यावी. अशा अनेक सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. बँक कर्मचारी व व्यापाऱ्यांनी याबाबत काही सूचना दिल्या व सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.

Comments are closed.