औषधीशास्त्र संस्थेतील २५०० प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षण

झरी तालुक्यातील प्रा. डाॅ. सतिश पोलशेट्टीवारने दिले प्रशिक्षण

0
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संक्रमणामुळे उदभवलेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत फाॅर्मसी विद्यार्थांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता MSBTE द्वारा प्रायोजित व M.C.E. Institute of pharmacy Pune आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील औषधी निर्माण शास्त्र संस्थेच्या प्राध्यापकांना  सहा दिवशीय ऑनलाईन प्रशिक्षण प्रा.डाॅ.सतिश अरूणराव पोलशेट्टीवार यांनी दिले.
ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन  M.C.E. Institute of pharmacy चे प्राचार्य डाॅ.व्हि.एन. जगताप आणि सहकारी प्राध्यापकांनी केले. या कार्यशाळेमुळे अध्यापकांनी विद्यार्थांसाठी बाइंडर एन्टरप्राईझ व्हर्जन,गुगल क्लासरूम आणि गो ब्रॅंच या वेबसाईटचा प्रभावी वापर करून विद्यार्थांसाठी आभासी वर्ग (Virtual classroom)तयार केले. यामध्ये विद्यार्थांना अवघड विषयाचे मार्गदर्शन, पुस्तके, नोटस, प्रश्नावली पाठविण्यात येत आहे. ही प्रश्नावली विद्यार्थ्याकडून ऑनलाईन सोडवून लगेच निकाल पण देण्यात येत आहे. या कार्यशाळेत सुमारे २५०० प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

 झरी तालुक्यातील मांगली(हिरापूर) या मुळ गावचे रहिवासी असलेले प्रा.डाॅ. सतिश अरूणराव पोलशेट्टीवार यांनी  औषधी निर्माण शास्त्र शिक्षणाची सुरूवात वणी येथील S.P.M. institute of pharmacy  येथून केली. ते पुणे येथील M.I.T. WPU school of pharmacy Pune. या नावाजलेल्या संस्थेत प्रोफेसर अँड डायरेक्टर करिअर सर्विसेस इन फॅकल्टी ऑफ फाॅर्मसी या पदावर कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. या कार्यशाळेमुळे प्रा. डाॅ.सतिश पोलशेट्टीवार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

[cvct-advance id=”14539″]

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.