जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे आदेश

भाजपचे सतिश नाकले यांनी केली होती तक्रार

0

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेपासून तर पदवीधर पर्यंत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी सर्व शिक्षक आपाआपल्या गावी निघून गेले. परंतु आता शाळा सूरु करण्याच्या निर्णयामुळे बाहेर तालुका तसेच जिल्ह्याततुन शिक्षक झरी तालुक्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही कोरोनाची भीती

तालुक्यातील शिक्षक वणी यवतमाळ पांढरकवडा व इतर ठिकानावरून ये-जा करीत आहे. यवतमाळ दारव्हा नेर महागाव व आता वणीला कोरोनाचे ७ रुग्ण आढळल्याने झरी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच अनुषंगाने भाजपा तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांनी शिक्षण विभाग व तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्याच्या बाहेरून आलेल्या शिक्षकांना १४ दिवसाकरिता कोरन्टाईन करण्याची मागणी केली व मुख्यालय व तालुक्यात राहूनच शाळेत ये-जा करण्याची मागणी केली होती.

गटशिक्षणाधिकारी हडोळे यांनी सदर निवेदनाची दखल घेत तालुक्यातील सर्वच जिला परिषद शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे पत्र दिले आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून सर्वांना कोरन्टाईन करणार असल्याचीही माहिती देण्यात आली.

कार्यालयीन काही कर्मचारी वणी व यवतमाळ येथून ये-जा करीत असून या लोकांमुळे चिंता वाढली आहे. ते मुख्यालय राहणार की नाही याची भीती हाडोळे यांनी व्यक्त केली. कोरोनाची भीती सर्वांनाच असून दिलेल्या आदेशाचे पालन शिक्षकांनी केलेच पाहिजे असे मत व्यक्त केले. तालुक्यात १०० च्या जवळपास शाळा असून शेकडो शिक्षक कार्यरत आहे. एखाद्या बाहेरून आलेल्या शिक्षकांच्या चुकीने कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यास याला जवाबदार कोण असा प्रश्न नाकले यांनी उपस्थित केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.