सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे लोकमाता अहिल्याबाई होळकर व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड झरी तर्फे अडेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, तालुकाध्यक्ष देव येवले, शाखा अध्यक्ष राजू काळे डॉ. प्रशांत बोबडे, मासिरकार, नामदेव ठेंगणे, दत्ता डोहे, आशिष रिंगोले, अमोल टोंगे, समीर लेनगुरे, कुणाल पानेरी यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. कार्यक्रम पार पडला.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपला आहे. प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबिर शासनाने दिलेले सर्व मार्गदर्शक तत्व पाळून घेतले गेले. शिबिराचे संपूर्ण ठिकाण हे वेळोवेळी सॅनिटाईज केले गेले तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात जवळपास 50 कार्यकर्ते आणि ग्रामस्थानी रक्तदान केले.
संदीप आसुटकर, केतन ठाकरे, आशिष झाडे, शुभम राऊत, राहुल हिवरकर, भूषण काटकर, तुषार राऊत, सुमित क्षीरसागर, गणपत जगताप, प्रेम पानघाटे, प्रवीण बोधे, पिंटू शेंगर, सुरेश धोटे, दीपक पाल यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.