बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 मध्ये ऑरो मशिन (शुद्ध पाण्याचे फिल्टर) याचे उद्घाटन कऱण्यात आले. वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. ही मशिन स्व. जय राजेश गोहणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजेश गजानन गोहणे यांच्या कडून भेट देण्यात आली.
असं म्हणतात की रोगराई पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे अशुद्ध पाणी. लहाण मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने अशुद्ध पाणी चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी शाळा क्रमांक 5 मध्ये राजेश गोहणे यांनी आरो मशिन भेट दिली.
गुरूवारी सकाळी एका कार्यक्रमात नगराध्यक्षांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पालिकेचे मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती आरती वांढरे, बांधकाम सभापती वर्षा खुसपुरे, नगरसेवक नितीन चहानकर, निलेश परगंटीवार, शाळा समितीच्या अध्यक्ष मोहसीना खान उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले.
उदघाटन पर मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष तारेंंद्र बोर्डे म्हणाले की…
नगर पालिकेची शाळा ही गोर गरीबांची शाळा म्हणून ओळखली जाते. मात्र अशी जरी ओळख असली तरी त्यांना अत्याधुनिक शिक्षण, सोयीसुविधा द्यावे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशिल असतो. विद्यार्थी दिवसभर या शाळेत असतो त्यामुळे त्यांना वेळोवेळी पाणी त्याला दिवसभर शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पुढाकार घेतला याचा मला आनंद आहे. भविष्यात शाळेला सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण करून एक मॉडेल शाळा बनविण्याचा आमचा प्रयत्न असेल.
या प्रसंगी आरती वांढरे यांनी समाज सहभागातून शुद्ध पाण्याचा प्लांट उभारल्याबाबत आनंद व्यक्त केला. मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर यांनी समयोचित प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे संचालन प्रेमदास डंभारे यांनी केले. आभार प्रदर्शन गीतांजली कोंगरे यांनी केले. या प्रसंगी माजी मुख्याध्यापक रमेश खडसे, जयंत सोनटक्के, मीना काशीकर, रजनी पोयाम, दर्शना राजगडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.