वणी(रवि ढुमणे): सध्या उपवर मुलामुलींचे लग्न जमविणे सोबतच जमलेले लग्न उरकण्याचा सपाटा सुरू आहे. यातच समाजाच्या रूढी परंपरेला तडा देत एका तरुणाने अनाथ असलेल्या मुलीसोबत लग्न करून जीवनाचा आधार दिला आहे.
लग्न जमवायचं म्हटलं की, मुलाकडे संपत्ती किती आहे. कुठे नोकरी करतोय, तर दुसरीकडे मुलगी कशी आहे. तीच कुटुंब कस, वागणूक कशी,दिसायला सुंदर आहे का? इतकेच नव्हे तर हुंड्यात काय काय मिळेल? असे अनेक प्रश्न विचारले जातात किंवा उपस्थित होतात. लग्न करायचे म्हटले की,लावला बाजार, मग माध्यस्थीची भूमिका महत्वाची. पोरीचा बाप मुलाकडे संपत्ती किती? तो नोकरीवर आहे. मग त्याला 10 ते 20 लाखाचे पॅकेज द्यायला हरकत नाही. असे म्हणून लग्नाला होकार देतो. लग्नाची वेळ येते आणि मुलीकडून मिळालेल्या पॅकेजच्या पैशाने मुलाची वरात”डीजे लावून निघते” मुहूर्ताची वेळ केवळ पत्रिकेत पण दोस्ताना खुश। करावं लागतं अन ते बी सासऱ्याचा पैशावर…
आजही समाजात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्याच्याकडे संपत्ती आहे. तोच मागतो आहे. आणि मुलगी सुखात राहावी म्हणून बाप सुद्धा देतो आहे. या रूढी परंपरेला फाटा देत समर्थवाडी यवतमाळ येथील अतुल पुंडलीकराव किनकर या तरुणाने अनाथ मुलीला जीवनसाथी करण्याचे धाडस करीत वणी येथील आंनद बालसदन मधील सोनू या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
27 जानेवारीला 11 वाजून 47 मिनिटांनी वरोरा मार्गावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात अतुल व सोनू चा विवाह सोहळा पार पडणार आहे. हा लग्न सोहळा आनंद बालसदन परिवाराने आयोजित केला आहे.
अतुल किनकर या तरुणाने अनाथ पोरीला जीवनसाथी करण्याचे धाडस दाखवून समाजाला एक
आदर्श संदेश दिला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.