जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन, वणी मार्गावर नेरड गावाजवळ कोळसा भरलेला हायवा. ट्रक पलटी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
माहितीनुसार (MH40N2559) क्रमांकाचा 16 चाकी तर्क पहाटेच्या दरम्यान मुकुटबन येथील कोळसा खाणीतून कोळसा भरून वणीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान नेरड गावाजवळ विदर्भ नदीजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. मात्र सुदैवाने चालक सुखरूप असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी वणी बहुगुणीला दिली.
मुकुटबन मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीचा कहर
मुकुटबन,अडेगाव परिसरातून कोळसा, डोलोमाईट, चुनखडीची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. 30 ते 50 टन वजनाची जड वाहतूक या रस्त्यावर होत आहे. मुकुटबन येथील दोन कोळसा खाणीतुन सुरु कोळसा वाहतुक करणाऱ्या 16 चाकी हायवा वाहनांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिवाय या ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गावर प्रदूषणची समस्या निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा…
Comments are closed.