पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा विविध पक्ष व संघटनांनी केला निषेध

युवासेनेची शिवतीर्थावर निदर्शने तर मानवी हक्क सुरक्षा परिषदेने वाहिली श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे , वणी: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटलेत. या घटनेच्या निषेधार्थ विविध पक्ष, संघटना आणि संस्थांनी निदर्शने केलीत. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिल्यात. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेनेनं उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात घटनेचा निषेध केला. तर मानवी हक सुरक्षा परिषदेनं मेणबत्त्या प्रज्वलीत करून त्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

युवासेनेनं यावेळी दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्यात. झालेल्या प्रकाराबद्दल आपला संताप व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याला चप्पल मारो आंदोलन केलं. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकात्मक तिरडी काढून तो जाळला. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
या आंदोलनात सबिर शेख, कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागभिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे, शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर, अनिकेत बदकल, अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे, बबन केळकर व मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्याचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेनंही निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरीकांना मेणबत्ती प्रज्वलीत करून श्रद्धांजली वाहिली. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याच्या भावना परिषदेनं व्यक्त केल्यात. यावेळी अध्यक्ष म्हणून विजय नगराळे होते. कार्यक्रमाचे संचालन वामन कुचनकार यांनी केलं. यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, वामन कुचनकार, विजय नगराळे, अमोल कुमरे, श्रीकांत हनुमंते, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुमित्रा गोडे, प्रमिला चौधरी, सुनिता काळे, पुष्पा कुळसंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.